Numerology Prediction: काही लोक आपली खरी विचारसरणी कधीच समोर येऊ देत नाहीत. ते चेहऱ्याने खूप शांत आणि निरागस दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक विचार सुरू असतात. अंकशास्त्रानुसार, काही मूलांकाचे लोक खूपच हुशार आणि मास्टरमाइंड व्यक्तिमत्त्वाचे मानले जातात. जाणून घेऊया, कोणत्या मूलांकाचे लोक असे असतात.
आधी तुमचा मूलांक काढा
अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारावर व्यक्तिमत्त्व सांगितलं जातं, त्यामुळे आधी तुमचा मूलांक जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमची जन्मतारीख एकत्र जोडा.
उदाहरणार्थ, तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला झाला असेल, तर (२+६=८) तुमचा मूलांक ८ असेल. आता जाणून घेऊया मास्टरमाइंड मूलांकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल.
मूलांक ५ : मनाचे खेळ खेळण्यात पटाईत
५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक खूप स्मार्ट, मनाचे खेळ खेळण्यात पटाईत आणि उत्तम संवादकौशल्य असलेले असतात. हे लोक वरून शांत आणि निरागस दिसले तरी, मागून आपलं काम करून जातात. त्यांच्या चातुर्याचा अंदाज लावणं प्रत्येकाच्या हातात नसतं.
मूलांक ७ : शांतपणे आपला डाव साधतात
७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. केतूच्या प्रभावामुळे हे लोक खूप गूढ स्वभावाचे असतात. हे लोक खूप शांत राहतात आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतात. मात्र, त्यांचा मेंदू खूप वेगाने काम करत असतो. ते शांतपणे आपला डाव साधतात आणि लोकांना त्याची कल्पनाही येत नाही.
मूलांक ८ : हळू चालतात, पण मोठा डाव खेळतात
८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. मूलांक ८ चे लोक शांत स्वभावाचे आणि मेहनती असतात. हे लोक कोणताही गाजावाजा न करता शांतपणे आपलं काम करत राहतात आणि कुणालाही त्याची चाहूल लागत नाही. अचानक एक दिवस त्यांना मोठं यश मिळतं. हे लोक बदला घ्यायचं विसरत नाहीत, पण त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
