Blue Moon 2026 Effect : ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोन्ही दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे. जेव्हा एकाच महिन्यात दोन पूर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पूर्णिमेला ‘ब्लू मून’ म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. या खगोलीय घटनेचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला, तरी काही राशींसाठी हा काळ विशेष लाभ आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींवर याचा काय प्रभाव पडेल. (Scorpio Blue Moon)

१. मेष राश‍ी (Aries)

ब्लू मून मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. व्यापारात नवीन ऑर्डर्स किंवा मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोर्ट-कचेरी किंवा कायदेशीर बाबींमध्ये मित्राच्या मदतीने तोडगा निघू शकतो.कुटुंबात भावंडांशी असलेले संबंध मधुर होतील आणि आरोग्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल.

२. सिंह राशी (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच अनुकूल असणार आहे.मित्रांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली वाहन किंवा मालमत्ता (Property) खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार वर्गाला पदोन्नतीचे (Promotion) योग आहेत.अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेम किंवा मैत्रीची सुरुवात होऊ शकते.

३. मकर राशी (Capricorn)

मकर राशीसाठी हा ‘स्कॉर्पिओ ब्लू मून’ सकारात्मक परिणाम घेऊन येईल.कुटुंबातील एखाद्या सदस्याला कामाच्या निमित्ताने परदेशी किंवा बाहेर गावी जावे लागू शकते.मित्रांसह एखाद्या धार्मिक यात्रेचे नियोजन होऊ शकते.कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र सध्याच्या काळात अधिक मेहनत घ्यावी लागेल.

४. मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला राहील.घरात परदेशी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते किंवा एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. सासरच्या मंडळींकडून एखादी भेटवस्तू किंवा मोठे सहकार्य मिळण्याचे योग आहेत.नोकरदारांना सहकाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. व्यापारात कोणत्याही व्यक्तीवर विचार न करता आंधळा विश्वास ठेवणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)