झाडू ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाचा घरात असतेच. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. झाडूला लक्ष्मीचे रूपही म्हटले जाते. शेवटी झाडू लक्ष्मीचे रूप का आहे? असा प्रश्न अनेकांना असतो, घरातील कचरा, घाण बाहेर पडली की स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती आपोआप येते, लक्ष्मी माता प्रवेश करते. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झाडू खरेदीचे ‘हे’ नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे

१. जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर शनिवारीच खरेदी करा. तसेच शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते, म्हणजेच जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा.

२. जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन झाडू घ्या

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

३. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य आहे, जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा जेथे ते दिसत नाही.

४. स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत झाडू ठेवू नये, यामुळे रोग आणि गरिबी येते.

५. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये.

६. कधी कधी रात्री झाडू मारावा लागला तरी त्याचा कचरा दुसऱ्या दिवशीच टाकावा.

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

७. घरात झाडू कधीही उभा ठेवू नका, झाडू नेहमी खाली पडून ठेवा.

८. जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर त्याने बाहेर पडताच झाडू लावू नये, किमान अर्ध्या तासानंतरच झाडू लावावा.

९. झाडूवर पाय ठेवल्याने महालक्ष्मीचा अनादर होतो, म्हणूनच चुकून जर झाडूला पाय लागला तर लगेच तिच्यापुढे नतमस्तक होऊन क्षमा मागितली पाहिजे.

१०. झाडूबद्दल एक मनोरंजक गोष्ट देखील आहे, ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही.

आणखी वाचा : Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत

११. यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या सणाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे आवश्यक आहे, तसेच आपल्या घराचा झाडू आणि देव घराचा झाडू वेगवेगळा ठेवावा.

१२. घरातील साफसफाईसाठी तुटलेल्या झाडूचा वापर करू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने घरात नकारात्मकता पसरते, त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद होतात. घरामध्ये स्वच्छता केल्याने वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात. त्यामुळे घरातील साफसफाईसाठी घाण किंवा ओला झाडू वापरू नये, असे केल्याने लक्ष्मीजी नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आणखी वाचा : मराठीतला आजवरचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?

१३. वास्तुशास्त्रात झाडू जाळण्यास मनाई आहे, असे म्हणतात की झाडू जाळणे हे अत्यंत अशुभ कृत्य आहे. असे केल्याने तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच घराच्या छतावर झाडू ठेवण्यासही मनाई आहे. सूर्यास्तानंतर घर झाडण्यासही मनाई आहे. असे म्हणतात की रात्री झाडूने झाडू मारल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजेच्या ठिकाणी वापरण्यात येणारा झाडू इतर कोणत्याही ठिकाणी वापरू नये.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Broom benefits why broom is a maa lakshmi form know broon buying rules dcp
First published on: 15-05-2022 at 15:10 IST