Premium

‘लक्ष्मी नारायण योग’ तयार झाल्याने ‘या’ राशी पुढील वर्षात होणार श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा

लक्ष्मी नारायण योग तयार झाल्याने काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो.

Lakshmi Narayan Yog
'या' राशी होणार गडगंज श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Laxmi Narayan Yog: २०२३ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. ज्योतिष्यशास्त्रानुसार, डिसेंबर महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. या ग्रहाच्या राशी परिवर्तनाने काही शुभ योग तर काही अशुभ योग तयार होणार आहेत. अशातच वर्षाच्या शेवटी २८ डिसेंबरला बुधदेव वक्री अवस्थेत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. तिथे आधीपासूनच सुखदाता शुक्रदेव विराजमान आहेत. त्यामुळे ‘लक्ष्मी नारायण योग’ निर्माण होत आहे. ज्यामुळे काही राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुक्रदेव आणि बुधदेव नवीन वर्षात प्रचंड पैसा कमावण्याची संधी देऊ शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी ‘लक्ष्मी नारायण योग’ फलदायी ठरु शकतो. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात जबरदस्त फायदा होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती या काळात चांगली राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातातवरण चांगलं राहू शकते.

(हे ही वाचा : ४८ तासात ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ? सुखदाता शुक्रदेव राशी परिवर्तन करताच मिळू शकते नशिबाला कलाटणी )

मिथुन राशी

‘लक्ष्मी नारायण योग’ बनल्याने मिथुन राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. परदेशी प्रवास करणे फायदेशीर ठरु शकतो. व्यवसायातही या राशीतील लोकांना तुम्हाला मोठे यश मिळू शकते. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढू शकते. बँक बॅलन्स वाढल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना ‘लक्ष्मी नारायण योग’ बनल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. धनलाभ होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल. या राशीतील लोकांना नव्या गुंतवणुकीची मोठी संधी मिळू शकते. भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budh and shukra yuti make lakshmi narayan yog these three zodiac signs bank balance to raise money pdb

First published on: 29-11-2023 at 10:58 IST
Next Story
Daily Rashi Bhavishya : ‘या’ राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या तुमचे भविष्य