Budh Ast In May 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. याशिवाय बुध अस्त, वक्री आणि मार्गी देखील होतो. लवकरच बुध अस्त होणार आहे. पंचांगानुसार, बुध ग्रह ०२ मे २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून ३० मिनिटांनी अस्त होणार असून तो २३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी १९ वाजून ५८ मिनिटांनी अस्त स्थितीतून बाहेर येईल. बुध तब्बल २२ दिवसांसाठी अस्त होईल. बुधाची ही स्थिती काही राशींसाठी अशुभ असली तरी काही राशींच्या लोकांसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे.
बुधाची अस्त स्थिती ‘या’ राशींना मालामाल करणार
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाची अस्त स्थिती नक्कीच अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा चांगली होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. केवळ मेहनत कायम ठेवावी लागेल. प्रयत्नांचे उत्तम फळ मिळेल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींना बुधाची अस्त स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.
मीन (Meen Rashi)
बुधाची अस्त स्थिती मीन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील.
धनु (Dhanu Rashi)
बुध ग्रहाची अस्त स्थिती धनु राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
