ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात लहान मानला जातो, परंतु तो खूप महत्त्वाचा आहे. बुध ग्रहाला ज्योतिष शास्त्रात “ग्रहांचा राजकुमार” मानले जाते. हा ग्रह बुद्धी, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य व्यापार आणि आर्थिक व्यवहार यावर प्रभाव टाकतो. २७ एप्रिल २०२६ पासून बुध ग्रह मेष राशीत अस्त अवस्थेत आहेत आणि २३ मे २०२६ पर्यंत ते अस्त स्थितीत राहणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध सूर्याच्या जवळ आल्यावर अस्त होतो. या अवस्थेत ग्रहाची चमक आणि प्रभाव कमी होतो. त्यामुळे, बुधाच्या नीचतम स्थानात असण्याचा परिणाम अनेक राशींच्या तर्कशक्ती, बुद्धिमत्ता, नीटनेटकेपणा आणि व्यवसायावर होऊ शकतो. जाणून घ्या, बुधाच्या कोणत्या राशींमध्ये तणाव वाढेल.
या काळात मेष, कर्क , तूळ आणि मकर या चार राशींना विशेष सावध राहण्याचा इशारा देण्यात येत आहे. बुध अस्त अवस्थेमुळे या राशींच्या जीवनात तणाव, निर्णय गोंधळ आणि आर्थिक अस्थिरता वाढू शकते.
मेष राशी (Aries)
हा काळ करिअर आणि व्यावसायिक क्षेत्रात आव्हानात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात.
कर्क राशी (Cancer)
या काळात आर्थिक चढ-उतार दिसू शकतात. मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहणे योग्य ठरेल. कोणतेही आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार आवश्यक आहे, अन्यथा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तूळ राशी (Libra)
बुध अस्त काळ आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये अडथळे निर्माण करू शकतो. कामात विलंब आणि संधी गमावण्याची शक्यता असू शकते. मात्र संयम आणि सतर्कता ठेवली तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते.
मकर राशी (Capricorn)
मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायातील योजनाअपेक्षेनुसार यशस्वी न होण्याची शक्यता असल्यामुळे चिंता वाढू शकते. या काळात शांतपणे निर्णय घेणे आणि जोखीम टाळणे महत्त्वाचे ठरेल.
एकूणच बुध ग्रहाचा हा अस्त काळ सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रमाणात प्रभाव टाकू शकतो. विशेषतः वरील चार राशींनी २३ मेपर्यंत अधिक सावध राहून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे, असे ज्योतिषीय विश्लेषणातून स्पष्ट होते.
