Budh Asta 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह, नक्षत्र, ताऱ्याच्या हालचालींचा १२ राशींच्या जीवनावर परिणाम होतो. पुढच्या मे महिन्यात बुध ग्रहाचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येईल. या महिन्यात बुध सूर्याच्या खूप जवळ असेल, यामुळे बुध अस्त होईल. बुध अस्त होताच अनेक राशींनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध अस्ताचे परिणाम २३ मे २०२६ पर्यंत दिसून येतील. पण, याचा सर्वाधिक नकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर दिसून येईल जाणून घेऊ…
बुध अस्त म्हणजे काय? त्याचे काय परिणाम होतात?
बुध ग्रहाचे सूर्याच्या खूप जवळ येणे याला बुध ग्रहाचे अस्त होणे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी होतो, अशा परिस्थितीत त्या ग्रहाची ती कमजोरी मानली जाते, त्याचा प्रभाव कमी होतो.
बुध हा बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि व्यवसायावर विशेषत: परिणाम करतो. या काळात अडचणींवर मात करणं थोडं अवघड होतं. गैरसमज वाढण्याची शक्यता आहे.
बुध ग्रहाच्या अस्ताचा कोणत्या राशींवर परिणाम होईल?
मेष
मेष राशीच्या लोकांना बुध अस्ताचा वाईट परिणाम सहन करावा लागेल. या काळात घाईने निर्णय घेणे टाळा, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. बोलताना संयम बाळगा आणि परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करून मगच बोला. तुम्हाला व्यावसायिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. अगदी लहानसा निष्काळजीपणाही तुम्हाला संकटात आणू शकतो. इतरांचे सल्ले ऐका, पण अंतिम निर्णय तुमच्या मताने आणि काळजीपूर्वक घ्या. जितके जास्त शांतपणे काम कराल तितके नुकसान कमी होईल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो. लहान लहान गोष्टींवरून तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, ज्यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होईल. पण लोकांचे बोलणे तुम्ही मनावर घेऊ नका, नाहीतर गैरसमज वाढू शकतात, लोकांना प्रतिउत्तर देणे टाळा. संयम ठेवा आणि स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करा.
तूळ
बुध अस्ताचा परिणाम तूळ राशीच्या लोकांवरही दिसून येईल. या राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही कामांमध्ये अडथळा येण्याची दाट शक्यता आहे, यामुळे या काळात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. तसेच त्यावर चर्चा करणे टाळा. शांत राहून प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा.
मकर
मकर राशीच्या लोकांचा मानसिक ताण वाढू शकतो. प्रत्येक कामात त्यांना वारंवार अडचणी येऊ शकतात. कधीकधी ठरवल्यानुसार गोष्टी घडत नाहीत, त्यामुळे चिडचिड आणि गोंधळ वाढू शकतो. घाईने निर्णय घेणे टाळा आणि प्रत्येक काम करण्यापूर्वी थोडा विचार करा. या काळात संयम खूप महत्त्वाचा आहे, जर तुम्ही शांत मनाने आणि परिस्थितीचे काळजीपूर्वक नियोजन करत काम केल्यास अडचणी कमी होतील. तुमचा दृष्टिकोन स्पष्टपणे मांडा आणि इतरांचा दृष्टिकोनही समजून घ्या, यामुळे समस्या आपोआप कमी होतील.
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
