Budh Enter In Mithun Rashi: ज्योतिषशास्त्रामध्ये, बुद्धी आणि व्यवसायाचा कारक ग्रह म्हणून बुध ग्रहाकडे पाहिले जाते. जो एका विशिष्ट कालावधीनंतर राशिबदल करतो, ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वादविवाद, शिक्षण, आदर, व्यवसाय, ज्ञान, बौद्धिक क्षमता इत्यादींचे कारक मानले जाते. बुध १५ दिवसांत राशिबदल करीत असतो. या काळात अनेकदा तो अस्त, मार्गी, वक्रीदेखील होतो. सध्या बुध कुंभ राशीत विराजमान असून तो २९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी आपले स्वामीत्व असलेल्या मिथुन राशीत गोचर करेल. बुधाचे स्वराशीतील गोचर नेहमीच खास मानले जाते. मिथुन व कन्या या बुधाचे स्वामीत्व असलेल्या दोन राशी आहेत.

बुधाचे स्वराशीतील गोचर भाग्य उजळवणार

मिथुन (Mithun Rashi)

बुधाचे स्वराशीतील गोचर मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात अनुकूल परिणाम दिसून येतील. भावा-बहिणींमधील दीर्घकाळापासून चालत आलेला दुरावा आता संपुष्टात येऊ शकतो. नाते अधिक घट्ट होईल. नवीन मित्र बनवता येतील. तसेच त्यांच्यासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते; पण कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यापूर्वी एकदा विचार करा. शिक्षण क्षेत्रातही चांगला परिणाम दिसून येईल. तुम्हाला बऱ्याच काळापासून असलेला एखाद्या गोष्टीबद्दलचा त्रास आता कमी होऊ शकतो.

कन्या (Kanya Rashi)

बुधाचे स्वराशीतील गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत मोठा नफा मिळू शकतो. शिक्षण क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ते नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही अनुकूल ठरू शकते. तुम्ही करीत असलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळू शकेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. त्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. त्याशिवाय उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते.

सिंह (Singh Rashi)

बुधाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने अनुकूल या राशीच्या लोकांना परिणाम दिसून येतील. अडकलेले पैसे मिळू शकतात आणि प्रलंबित कामे पुन्हा एकदा सुरू करता येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा कल अध्यात्माकडे असेल. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक धार्मिक यात्रा करू शकता. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले, तर तुम्ही तुमच्या स्पर्धकांशी उत्तमरीत्या तोंड देताना दिसू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि समाजात तुमचा आदर वाढेल.भविष्यासाठी तुम्ही पैसे बचत करून ठेवू शकता. प्रत्येक कामात यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)