Premium

‘या’ 4 राशींच्या लोकांना बुधदेव देणार प्रचंड श्रीमंती? व्यवसायात अपार प्रगतीचा सुवर्णयोग

बुध परिवर्तन करुन वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

Budh Gochar 2023
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि संपत्तीचा कारक मानला जातो. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि संपत्तीचा कारक आहे. जर कुंडलीत बुध बलवान असेल तर तो माणूस खूप हुशार आणि बोलण्यात पारंगत असल्यामुळे व्यापारी बनू शकतो. तर कमकुवत बुधमुळे बोलण्यात समस्या निर्माण होऊ शकते. येत्या ७ जून रोजी बुधचे गोचर होणार आहे. बुध राशी परिवर्तन करुन वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध ७ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीतील बुध प्रवेश मेष, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना त्रासदायक ठरु शकतो. तर बुध गोचरमुळे ४ राशींचा लोकांना चांगला लाभ होण्याती शक्यता आहे. बुध गोचर कोणत्या राशींसाठी शुभ ठरु शकते ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ –

बुध गोचर करुन वृषभ राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांना मोठा लाभ देऊ शकतो. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते. इच्छित पदोन्नती आणि पगारात वाढ यामुळे तुमचे मन प्रसन्न होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने आर्थिक समस्या संपू शकतात.

कर्क –

हेही वाचा- सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश घेत ‘या’ ५ राशींच्या भाग्याला देईल झळाळी? ‘या’ रूपात लक्ष्मी बनवू शकते लखपती

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध गोचर खूप शुभ ठरु शकते. या लोकांना पैसे मिळू शकतात तसेच नोकरीत प्रगती होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात देखील यश मिळू शकते. या काळात एखादा मोठा व्यवहार होऊ शकतो. गुंतवणूक करू शकता. बचत करण्यासाठी देखील ही वेळ चांगली ठरु शकते.

वृश्चिक –

बुध ग्रहाचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक दोन्ही फायदे देऊ शकते. वाणीच्या बळावर काम कराल, कामात यश मिळू शकते. या काळात उत्पन्नातही वाढू होऊ शकते. नम्रपणे बोललात तर अवघड कामेही सोपी होऊ शकतात.

धनु –

बुध राशीचे परिवर्तन धनु राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ देऊ शकते. नोकरीत अपेक्षित प्रगती होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात काहीतरी चांगले होईल ज्याचा तुम्हाला भविष्यातही लाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budh gochar 2023 lord mercury will give immense wealth to the people of these 4 zodiac signs jap

First published on: 26-05-2023 at 17:16 IST
Next Story
सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश घेत ‘या’ ५ राशींच्या भाग्याला देईल झळाळी? ‘या’ रूपात लक्ष्मी बनवू शकते लखपती