Kendra Trikona Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. सध्या बुध ग्रह चंद्राच्या कर्क राशीत विराजमान असून ३० ऑगस्टपर्यंत तो याच राशीत राहणार आहे. तसेच तो मीन राशीत केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्या राशींना करिअर, नोकरी आणि पदोपदी यश मिळेल.

‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. प्रत्येक कामात अग्रेसर असाल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Kumbha Rashi)

हा राजयोग कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात पदोपदी यश मिळवून देईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. धार्मिक कार्यात यश मिळेल.

मीन (Meen Rashi)

केंद्र त्रिकोण राजयोग मीन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आयुष्यात अनेक दिवसांपासून येणारे अडथळे दूर होतील. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)