Budh Gochar 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रहाला बुद्धी, व्यापार, वाणी व धनाचा कारक मानले जाते. जेव्हा बुधाचे गोचर होते, तेव्हा त्याचा प्रभाव कमी-अधिक, शुभ-अशुभ स्वरूपात प्रत्येक राशीवर दिसून येतो. कुंडलीमध्ये बुध शुभ स्थानी असल्यास कार्यस्थळी व विशेषतः बुद्धीच्या संबंधित कामांमध्ये विशेष लाभ होण्याची संधी असते. ही मंडळी आत्मविश्वासाने कला क्षेत्रात मोठी कामगिरी करू शकतात. अशा लोकांमध्ये बुद्धीच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता असते. आता येत्या नऊ दिवसांत म्हणजेच ६ जूनला बुध ग्रह स्वराशी मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे येत्या काळात तीन राशींच्या नशिबाचे दार उघडण्याची चिन्हे आहेत. या राशींवर माता लक्ष्मी धनवर्षाव करू शकते आणि येत्या काळात या मंडळींना प्रगतीच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊ…

बुध ग्रहाचे राशी बदल होताच ‘या’ राशींना मिळू शकतो अपार धन

सिंह

बुध ग्रहाचे भ्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नवीन संधी उपलब्ध होतील आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढू शकतो. या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकते. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. यावेळी तुमच्या घरात फक्त आनंदच राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू शकतं. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे.

कन्या

बुध ग्रहाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीतही नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. योजना आणि धोरणांच्या आधारे तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

मीन

बुध ग्रहाचे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. शेअर बाजारामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. करिअर क्षेत्रातही तुम्हाला यश मिळू शकतो. कुटुंबातून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. प्रेमविवाहाचीही शक्यता आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक फुलू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)