Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. ज्यामुळे अनेकदा तो एका महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करतो. शिवाय नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद परिवर्तनही करतो. सध्या बुध कुंभ राशीत विराजमान असून तो लवकरच देवगुरूच्या मीन राशीत जाईल.
पंचांगानुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २० मिनिटांनी बुध देवगुरूच्या मी राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध ३० एप्रिल २०२६ पर्यंत राहील. बुधाचे हे गोचर १२ पैकी राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायी सिद्ध होईल.
बुधाचे गोचर देणार भरपूर सुख-समृद्धी
मिथुन (Mithun Rashi)
बुधाचे गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
वृश्चिक (Vruschik Rashi)
बुधाचे गोचर राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीसाठी बुधाचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
