Mercury Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. मे महिन्यात बुध चार वेळा राशी परिवर्तन करणार आहे. पंचांगानुसार, बुध ११ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजून ४७ मिनिटांनी अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर १५ मे रोजी वृषभ राशीत आणि २९ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल आणि २९ मे रोजी दुपारी ०२ वाजून ३० मिनिटांनी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. बुधाच्या एकाच महिन्यातील चार वेळा होणाऱ्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल.

बुधाचे गोचर आयुष्य बदलणार

सिंह (Singh Rashi)

बुध ग्रहाचे चार वेळा होणारे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मेष (Mesh Rashi)

बुधाचे मे महिन्यात होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)