Lakshmi Narayan Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती असलेला बुध हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. बुध हा ज्ञान, बुद्धिमत्ता, शैक्षणिक क्षमता, व्यवसाय आणि युक्तिवाद यांचा कारक ग्रह मानला जातो. बुधाच्या राशी बदलाने १२ राशींच्या जीवनावर सकारात्मक- नकारात्मक परिणाम होत असतात. सध्या बुध कुंभ राशीत आहे. यानंतर एप्रिलमध्ये मेष राशीत आणि मेमध्ये वृषभ राशीत आणि अखेरीस मिथुन राशीत प्रवेश करेल. शुक्र आधीच या राशीत भ्रमण करतोय. यावेळी बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी-नारायण राजयोग निर्माण होईल, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या जीवनावर होईल. कोणत्या राशींवर काय परिणाम होतील जाणून घेऊ….
द्रिक पंचांगानुसार, बुध २९ मे रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल आणि २२ जूनपर्यंत तिथे स्थित असेल. यानंतर कर्क राशीत प्रवेश करून गुरूशी युती करेल. यापूर्वी बुध मिथुन राशीतील शुक्राशी युती करून लक्ष्मी-नारायण राजयोग तयार करेल. हा राजयोग ८ जूनपर्यंत असेल. यानंतर शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल.
मेष
बुध शुक्राच्या लक्ष्मी नारायण योगाने मेष राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात आणि धैर्यात वाढ होऊ शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या लहान भावंडांबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तुमचे युक्तिवाद आणि बोलण्याची पद्धत इतरांना प्रेरणा देऊ शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले न्यायालयीन खटले निकाली निघू शकतात.
वृषभ
लक्ष्मी नारायण योग वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. शुक्रामुळे अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासह तुम्ही भविष्यासाठी बचत करू शकाल. कमाईच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमचे बोलणे अधिक प्रभावी होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तुम्हाला शेअर बाजार आणि सोशल मीडियाद्वारेही पैसे मिळू शकतात.
मिथुन
बुध आणि शुक्राच्या युतीने तयार होणारा लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. आत्मविश्वास झपाट्याने वाढू शकतो. तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष देऊ शकता. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते.
कर्क
बुध ग्रहाचे मिथुन राशीतील संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीत जन्मलेले लोक अध्यात्माकडे वळू शकतात. त्यांची परदेश प्रवासाची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांचे निराकरण होऊ शकते.
सिंह
सिंह राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी लक्ष्मी-नारायण राजयोग अत्यंत शुभ ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. गुंतवणुकीतून भरीव नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील.
कन्या
बुध ग्रहाचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण ठरू शकते. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना त्यांच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायात महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदर आणि एक वेगळी ओळख मिळू शकते. तुमची नवीन नोकरीची शोधमोहीम यशस्वी होऊ शकते. कामाचे वातावरण सकारात्मक राहील आणि तुमची प्रतिमा मजबूत राहील.
तूळ
शुक्र आणि बुध यांची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकते. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळू शकते. त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक आणि वडिलांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. जीवनात सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. तथापि, आपल्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण राजयोगाने मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. सासरच्या लोकांशी संबंधित वाद मिटू शकतात आणि वडिलोपार्जित मालमत्ता किंवा वारसा हक्कातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
धनु
बुध ग्रहाचे गोचर धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल असू शकते. काळ नातेसंबंधांसाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही नवीन नातेसंबंध सुरू करू इच्छित असाल, तर तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठीही अनुकूल काळ असेल. जे आधीच व्यवसायात आहेत, त्यांना विस्ताराच्या संधी मिळू शकतात.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग नकारात्मक प्रभाव देणारा असेल. विरोधकांचा सामना करू शकाल आणि वाद मिटवण्याचे सामर्थ्य मिळवाल. तुमच्यावर काही कर्ज किंवा देणी असल्यास ती फेडण्याचे मार्ग सापडू शकतात. नोकरी किंवा सेवा क्षेत्रात असलेल्यांना त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसतील. पण, तुमच्या वडिलांशी मतभेद होऊ शकतात किंवा त्यांच्याकडून कमी पाठिंबा मिळू शकतो.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींची एकाग्रता आणि आकलनशक्ती अधिक मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही अभ्यासात किंवा बौद्धिक कार्यात चांगली कामगिरी करू शकाल. मुलांबरोबर तुमचे नाते सुधारेल आणि तुम्ही त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवाल. प्रेमसंबंधदेखील अधिक गोड आणि समजूतदार होतील. हा काळ विशेषतः विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असेल.
मीन
मीन राशीसाठी हा योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीत जन्मलेल्यांना अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो. सुखसोयी आणि ऐषारामात झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला शांती आणि आनंद मिळेल. वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. याव्यतिरिक्त फ्लॅट, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या आईसह चांगला वेळ घालवू शकता. मानसिक ताण कमी होऊ शकतो. या काळात व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. स्थावर मालमत्ता व्यवसायात असलेल्यांना फायदा होऊ शकतो.
