Budh Gochar 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात. त्यामुळे मानवी जीवनावर आणि जगावर परिणाम होतो. हे गोचर काहींसाठी शुभ तर इतरांसाठी अशुभ असू शकते. ग्रहांचा राजकुमार बुध २९ मे रोजी स्वत:च्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करेल. बुध हा वाणी, व्यवसाय, शेअर बाजार, अर्थव्यवस्था, तर्कशास्त्र आणि गणित या क्षेत्रांशी सबंधित मानला जातो. परिणामी, बुधाच्या गोचराचा या क्षेत्रांवर तसंच १२ राशींवर परिणाम होतो. तसंच तीन राशींना मोठा फायदा होऊ शकतो. तर मग या राशींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

भविष्य पंचांगानुसार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी ग्रहांचा स्वामी बुध स्वत:च्या राशी मिथुनमध्ये प्रवेश करेल. तो २२ जूनपर्यंत तिथेच राहील. जेव्हा बुध स्वत:च्या राशी मिथुनमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक चातुर्य यांना बळकट करतो. या काळात निर्णय घेण्याचे कौशल्य अधिक तीक्ष्ण होते आणि नवीन संधी ओळखण्याची क्षमता वाढते.

मिथुन राशी

हे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण बुध तुमच्या लग्न राशीतून भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुम्हाला नवीन प्रकल्प आणि संधईदेखील मिळू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. या काळात विवाहित व्यक्तींना सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव येऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात तुम्हाला आदर आणि सन्मानही मिळू शकतो.

सिंह राशी

बुध ग्रहाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. हे गोचर तुमच्या राशींतून उत्पन्न आणि नफ्याच्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे नेटवर्किंग आणि ओळखींच्या बाबतीत हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या उत्पन्नातही मोठी वाढ होऊ शकते. या काळात उत्पन्नाचे नवीन स्त्रोतही निर्माण होऊ शकतात. तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारू शकते आणि तुमची प्रभावशाली लोकांशी भेट होऊ शकते.

करिअरच्या नवीन संधी उपलब्ध आहेत आणि सांघिक कार्य हे यशाचे लक्षण आहे. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक आणि नियोजनामुळे मोठा नफा मिळू शकतो. या काळआत तुम्हाला तुमच्या मुलांसंबंधी चांगली बातमीही मिळू शकते.

कन्या राशी

बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तो तुमच्या राशीच्या कर्म भावातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती अनुभवता येऊ शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे. लेखन, शिक्षण, आयटी किंवा विश्लेषणात्मक कामात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळा प्रामुख्याने फलदायी ठरू शकतो.

या काळात तुमच्या मेहनतीला पूर्ण फळ मिळेल अशी चिन्हे आहेत आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबाही मिळू शकतो. बेरोजगार व्यक्तींना या काळात रोजगार मिळू शकतो. तुम्हाला फक्त कठो परिश्रम करत राहून आपल्या प्रयत्नांमध्ये दृढनिश्चयी राहायचे आहे.