Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, चातुर्य आणि व्यवसायाचा घटक मानला जातो. जेव्हा बुध आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या करिअर, आर्थिक परिस्थिती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. ७ जुलै २०२६ रोजी, बुध वक्री होऊन मिथुन राशीत प्रवेश करेल. बुधाचा मिथुन राशीतील प्रवेश अत्यंत शक्तिशाली आणि शुभ मानला जातो. हे गोचर अनेक राशींच्या जीवनात ‘सुवर्णकाळ’ घेऊन येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या सहा भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ज्यांचे भाग्य या काळात उजळू शकते.
मेष
बुधाचा गोचर मेष राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येईल. या काळात तुमचे संवाद कौशल्य उत्कृष्ट राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे कौतुक होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी, हे गोचर धनस्थानात होत आहे. याच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारेल. अडकलेला पैसा परत मिळू शकेल. तुमची बोलण्याची पद्धत अधिक मृदू होईल, ज्यामुळे तुम्हाला नवीन संपर्क साधता येतील आणि व्यावसायिक सौदे निश्चित करता येतील.
मिथुन
बुधाचे गोचर मिथुन राशीसाठी फलदायी ठरु शकते. तुम्हाला या काळात सर्वाधिक लाभ मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जर तुम्ही लेखन, मीडिया किंवा मार्केटिंग क्षेत्रात असाल, तर हा काळ तुमच्यासाठी प्रगतीची नवीन दारे उघडेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी, बुधाचे हे गोचर फायदेच फायदे घेऊन येईल. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल.
कन्या
बुध हा कन्या राशीचा स्वामी ग्रह असल्याने हे गोचर तुमच्यासाठी फलदायी ठरु शकते. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात. व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना यशस्वी होतील. वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारतील.
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुध गोचर नवीन संधी घेऊन येईल. या काळात, भाग्याची तुम्हाला मोठी साथ मिळेल. धार्मिक तीर्थयात्रा होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णकाळ ठरू शकतो.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
