Transit of Mercury in the second house of the eastern Bhadrapad Nakshatra :ग्रहांचा राजकुमार बुधाचे पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय पदामध्ये ३ मार्च २०२६ रोजी मंगळवारी पहाये ३.३३ मिनिटांनी गोचर होणार आहे. पण बुधाचे हे गोचर ४ राशींसाठी खास लाभादायी ठरणार आहे. बुधाच्या या नक्षत्र पद गोचरामुळे काही राशींच्या लोकांचा व्यवसायात विशेष फायदा मिळू शकतो. वाणीमध्ये मधुरता येऊ शकते आणि मोठे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास येऊ शकतो. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या राशी?
वृषभ राशी(Turus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे पद नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकते. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग मिळतील. व्यवसायात फायदा मिळण्याचे मार्ग उघडतील. समाजात सन्मान वाढू शकतो. काही लोकांना कोर्टाच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. नोकरी आणि बदल करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.कर्ज घेण्यासाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांना यश मिळू शकते.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांना बुधाच्या पद नक्षत्र गोचरमुळे अति शुभ परिणाम देऊ शकते. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे आणि कार्यक्रमात बुद्धीच्या जोरावर मोठ्यात मोठ्यात काम पूर्ण करू शकते. भाग्याची साथ मिळेल तर विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईस.कुटुंबाची साथ मिळू शकते. मेहनतीचे फळ देखील मिळू शकते.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना बुधाचे पद नक्षत्र गोचरचा लाभ मिळू शकतो. बँकेसंबधीत काम पूर्ण होईल. करिअरमध्ये शत्रुला मात द्याल. बुद्धीचा वापर करून मोठ्या संकटाचा सामना करू शकता. बऱ्याच काळापासून घेतलेले कर्जातून या काळात सुटका मिळेल. केलेल्या कामात यश मिळू शकते. दिर्घकाळापासून सुरु असलेले आजार दूर होतील.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना बुधाचे पद नक्षत्र गोचरचा खास लाभ मिळू शकतो. काही लोकांच्या बुद्धीत वाढ होईल आणि करिअरमध्ये सन्मान मिळेल. मोठे निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात लाभ मिळण्याची संधी आहे. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात प्रेम वाढेल. मोठ्या गुंतवणूकीतून लाभ मिळण्याचे योग आहेत.

