Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व दिले जाते. बुद्धी आणि वाणीचा कारक मानला जाणारा बुध ग्रह ३० एप्रिल २०२६ रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे हे गोचर अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे, कारण यावेळी सूर्य आधीच आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत विराजमान असेल.

मेष राशीत सूर्य आणि बुधाची ही भेट ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण करणार असली, तरी काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, या युतीमुळे मेष आणि वृषभसह काही राशींच्या व्यक्तींना करिअर आणि कौटुंबिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मेष राशी- आरोग्याची विशेष काळजी घ्या

बुध ग्रह मेष राशीच्या तृतीय भावात गोचर करणार आहे. या काळात मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्याशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. व्हायरल इन्फेक्शन किंवा हंगामी आजार होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो.

वृषभ राशी- खर्चावर नियंत्रण ठेवा

वृषभ राशीसाठी बुधाचे गोचर १२ व्या भावात होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या थोडा कठीण असू शकतो. खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना मनात अस्वस्थता जाणवेल. घाईघाईत कोणतीही खरेदी करणे टाळा, अन्यथा आर्थिक बजेट कोलमडू शकते.

मकर राशी- कौटुंबिक वादांपासून दूर राहा

मकर राशीच्या चतुर्थ भावात बुधाचे आगमन होत आहे. यामुळे घरगुती पातळीवर काही तणाव निर्माण होऊ शकतो. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील जुन्या समस्यांवर शांतपणे चर्चा करा, अन्यथा मानसिक तणाव वाढेल. नोकरीत एखादा कठीण प्रकल्प तुमच्यावर सोपवला जाऊ शकतो.

कुंभ राशी- अचानक बदलांसाठी तयार राहा

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध तृतीय भावात गोचर करणार आहे. या काळात तुम्हाला निर्णय घेण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल.

आयुष्यात अचानक काही मोठे बदल घडून येतील. जरी हा काळ धावपळीचा असला, तरी तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करू शकता. आपले ध्येय निश्चित करण्यासाठी ही वेळ योग्य आहे, परंतु घाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात.