Budh Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार बुध हा सर्वात चंचल ग्रह मानला जातो. बुध हा बुद्धी, वाणी, बौद्धिक क्षमता, शिक्षण, संवाद कौशल्य, तर्क-वितर्क आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. त्यामुळे बुधाच्या स्थितीत बदल झाल्यास त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाहायला मिळतो.

सध्या बुध आपल्या मूल त्रिकोण राशी असलेल्या कन्या राशीत भ्रमण करत आहे. तसेच तो उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात आहे. सप्टेंबरच्या मध्यात बुध नक्षत्र बदलून चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध चंद्राच्या नक्षत्रात गेल्यामुळे काही राशींच्या लोकांना मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा वाढण्यासोबतच मानसिक शांतताही मिळू शकते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रांत यश मिळवता येऊ शकते. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले जात आहे. चला जाणून घेऊया, बुध हस्त नक्षत्रात गेल्यामुळे कोणत्या राशींसाठी हा काळ शुभ ठरू शकतो…

द्रिक पंचांगानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध सध्या कन्या राशीत भ्रमण करत आहे. १३ सप्टेंबर २०२६, रविवार रोजी सकाळी १०:४७ वाजता तो हस्त नक्षत्रात प्रवेश करेल आणि २१ सप्टेंबर २०२६, सोमवार रोजी रात्री १०:४५ वाजेपर्यंत याच नक्षत्रात राहील. त्यानंतर तो चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. आकाशातील २७ नक्षत्रांपैकी हस्त हे १३वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र असून त्याची राशी कन्या आहे. हस्त नक्षत्र हे शुभ आणि खूप महत्त्वाचे नक्षत्र मानले जाते.

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचा हस्त नक्षत्रातील प्रवेश अनेक प्रकारे खास ठरू शकतो. मेष राशीच्या गोचर कुंडलीतील सहाव्या भावात बुध राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात.

तुम्ही तुमच्या विरोधकांच्या हालचाली ओळखून त्यांना शांत करू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास मोठे यश मिळू शकते. व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे.

तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्यात यश मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनही चांगले राहू शकते. जीवनसाथीच्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.

कन्या राशी (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. या राशीच्या लग्न भावात बुध भद्र महापुरुष राजयोग तयार करत आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी बुध हस्त नक्षत्रात प्रवेश करेल, त्याच दिवशी तो कन्या राशीत उदय होईल. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचा हस्त नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ ठरू शकतो.

तुम्ही तुमच्या बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकता. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. त्यामुळे व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

व्यवसायात नवीन करार होऊ शकतो, नवीन सुरुवात करता येऊ शकते किंवा नवीन ग्राहक मिळू शकतात. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. मात्र, आरोग्याची पूर्ण काळजी घ्या.

कुंभ राशी (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा हस्त नक्षत्रातील प्रवेश अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या आठव्या भावात बुध स्थित आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात.

सामान्यतः आठव्या भावात कोणत्याही ग्रहाचे असणे चांगले मानले जात नाही. मात्र, कुंभ राशीत बुध उच्च स्थितीत असल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत सुरू असलेल्या व्यवसायातही फायदा होऊ शकतो.

शिक्षणाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहू शकतो. संशोधन, गूढ विषय, ज्योतिष आणि मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या गंभीर आणि प्रभावी बोलण्यामुळे तुम्ही अनेक लोकांवर प्रभाव पाडू शकता. मात्र, आरोग्याबाबत सावध राहा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)