Budh Gochar in Cancer:  ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. बुध हा बुद्धिमता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेव ऑगस्ट महिन्यात आपली स्थिती बदलणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह २२ ऑगस्ट रोजी सकाळी ०६.२२ वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर ०४ सप्टेंबर रोजी बुध ग्रह थेट कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. या काळात अनेक राशींचं नशीब पालटेल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया…

बुधदेव ‘या’ तीन राशींना करणार मालामाल?

कन्या राशी

बुधदेवाचे राशीपरिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. करिअर आणि व्यवसाय मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

Pune Municipal Corporation, death certificate pune,
मरणानेही सुटका नाही!
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
Man putting hand inside crocodiles mouth crocodile shocking video
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
maruti suzuki alto price its in demand know specifications and features dvr 99
स्वस्तात मस्त! ‘या’ कारला बाजारात आहे मोठी मागणी, कमी बजेटमध्ये मिळेल फायदेशीर डील
risk of heart disease is increasing at a young age
कमी वयातच हृदयविकाराचा वाढतोय धोका! तो कसा ओळखावा जाणून घ्या…
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
According to chess player arjun Erigesi success comes from not thinking about results
दडपण झुगारणे महत्त्वाचे! निकालांबाबत विचार न केल्याने यश; बुद्धिबळपटू एरिगेसीचे मत

(हे ही वाचा : रक्षाबंधनानंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस, मिळेल धन? देवगुरु नक्षत्र बदल करताच मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी)

वृश्चिक राशी

बुधदेवाचे राशी बदल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुख घेऊन येणारे ठरु शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. तसेच, नोकरदार लोकांसाठी हा काळ भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना या काळात चांगले यश मिळू शकते इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येऊ शकतो. अनेक लाभाच्या संधी तुम्हाला या काळात मिळू शकतात. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधदेवाचे गोचर वरदानच ठरु शकते. या काळात तुमचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असल्यास ते करू शकता कारण तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस आणि समाजात मान-प्रतिष्ठा वाढू शकते. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)