Budh Gochar In Kanya Rashi 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. ग्रहांचा राजकुमार बुध, ७ सप्टेंबर रोजी स्वतःच्या स्वराशीत किंवा उच्च राशीत, म्हणजेच कन्या राशीत गोचर करत आहे. बुध २६ सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रात अनेक राजयोगांचे वर्णन केले आहे, परंतु त्यापैकी सर्वोत्तम आणि सर्वात फायदेशीर म्हणजे पंच महापुरुष राजयोग. भद्र योग हा पंच महापुरुष राजयोगांपैकी एक आहे. हा योग बुधामुळे तयार होतो. जेव्हा बुध केंद्रस्थानी किंवा स्वतःच्या राशीत असतो, तेव्हा भद्र राजयोग तयार होतो. या राजयोगाच्या प्रभावाने १२ पैकी काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकेल.

भद्र योग ‘या’ राशींना करोडपती बनवणार

मिथुन (Mithun Rashi)

भद्र योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचा भद्र योग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींनाही हा योग फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीसाठी भद्र योगाचा प्रभाव बुधाच्या स्थितीवर आणि कुंडलीतील भावांवर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे हा योग बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता वाढवणारा मानला जातो. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि अडकलेली कामे वेग घेऊ शकतात. आर्थिक नियोजनात सुधारणा होऊन उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होण्याची शक्यता असते. लेखन, शिक्षण, मीडिया, व्यापार, कम्युनिकेशन किंवा बुद्धीच्या जोरावर काम करणाऱ्यांना विशेष फायदा मिळू शकतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)