Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. बुध ०७ सप्टेंबर २०२६ रोजी आपली स्वराशी असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार असून बुध ग्रहाचे हे स्वराशीतील गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होईल.
बुध ग्रहाचे गोचर भाग्य उजळवणार
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
धनु (Dhanu Rashi)
बुध ग्रहाचे गोचर धनु राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहू शकतो. नवीन कामे सुरू करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळवता येईल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
