Budh Gochar In Kark Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. पंचांगानुसार, बुधाचे २२ जून रोजी कर्क राशीत राशी परिवर्तन होईल आणि १८ जुलै रोजी कर्क राशीतच बुध वक्री होईल. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी मार्गी होईल आणि ३० ऑगस्ट रोजी पुन्हा बुधाचे राशी परिवर्तन होईल. या दिवशी बुध संध्याकाळी ४ वाजून ४१ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल.

दरम्यान, २२ जून ते ३० ऑगस्टपर्यंतचा बुधाच्या परिवर्तन, वक्री आणि मार्गी चालीचा प्रभाव १२ राशींपैकी काही राशींवर नक्कीच पाहायला मिळेल.

बुध देणार बक्कळ पैसा

मिथुन (Mithun Rashi)

बुधाचे परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचे परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.

धनु (Dhanu Rashi)

बुधाचे परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)