ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह दर १८ दिवसांनी रास बदलतो. ग्रहाच्या गोचरामुळे मानवी जीवनावर परिणाम होत असतो. ग्रहांच्या कमी अधिक भ्रमणाच्या कालावधीमुळे अनेकदा दोन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह एका राशीत येतात तेव्हा योग तयार होतात. काहींसाठी हे योग शुभ, तर काहींसाठी अशुभ ठरतात. बुद्धी आणि व्यवसायकारक असलेला बुध ग्रह २४ मार्च रोजी गुरुच्या मीन राशीतप्रवेश करणार आहे. बुध ग्रह व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर राहील, पण तीन राशींना या काळात विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी.

कर्क: तुमच्या राशीत नवव्या भावात बुधचे भ्रमण होईल. या स्थानावरून नशिब आणि परदेश प्रवासाचा अंदाज बांधले जातात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात तुम्हाला फायदा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच करिअरमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित काही प्रवासही करू शकता. कर्क राशीचा स्वामी चंद्रआहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र देव आणि बुध ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

मिथुन: बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण बुध तुमच्या दहाव्या भावात प्रवेश करेल. हे स्थान करिअर आणि कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. या काळात तुमची कार्यशैली सुधारेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तसेच, जर तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यावेळी नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला इन्क्रीमेंट मिळू शकते.

Ketu Gochar 2022: दीड वर्षानंतर केतु बदलणार राशी, तीन राशींसाठी ‘अच्छे दिन’

वृषभ: तुमच्या संक्रमण कुंडलीत बुध ग्रह अकराव्या भावात गोचर करेल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे म्हटलं जातं. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. व्यवसायात यावेळी चांगला नफा संभवतो. जर तुम्ही चित्रपट, मीडिया किंवा मार्केटिंगशी संबंधित असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे.