Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. एप्रिल महिन्यात बुध दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. ज्यात सर्वात आधी तो ११ एप्रिल २०२६ रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करेल आणि ३० एप्रिल २०२६ रोजी तो मेष राशीमध्ये प्रवेश करेल. बुधाच्या एकाच महिन्यातील दोन वेळा होणाऱ्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल.
पंचांगानुसार, बुध ग्रह ११ एप्रिल २०२६ मध्यरात्री ०१ वाजून २० मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार असून ३० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०६ वाजून ५५ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल. बुधाचे हे दुहेरी गोचर १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक सिद्ध होईल.
बुध देणार दुप्पट धनलाभ
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील.
कन्या (Kanya Rashi)
बुधाचे गोचर कन्या राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
