April Astrology Budh Gochar Benefits: १३ एप्रिल २०२६, सोमवार रोजी दुपारी २:२६ वाजता ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा कारक बुध ग्रह शनीच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. बुध या नक्षत्रात २२ एप्रिलपर्यंत राहणार आहे. ज्योतिषानुसार, बुधाचं हे नक्षत्रातील गोचर ४ राशींसाठी प्रत्येक क्षेत्रात फायदेशीर ठरणार आहे. चला, जाणून घेऊया त्या ४ राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
बुध शनीच्या नक्षत्रात गेल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांचं नशीब खुलू शकतं. प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळू शकतं. नोकरीच्या संधी वाढतील. प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या योजना यशस्वी ठरू शकतात. धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टींकडे अधिक ओढ वाढेल. आयुष्यात आनंद येईल.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध शनीच्या नक्षत्रात जाणे शुभ ठरणार आहे. उत्पन्न वाढू शकतं. मोठ्यांच्या सल्ल्याने काम केल्यास यशाचे मार्ग खुलतील. कामाच्या ठिकाणी मोठं पद मिळू शकतं. बोलण्यात आणि वागण्यात सकारात्मक बदल दिसेल. जमिनीशी संबंधित कामांमध्ये फायदा होऊ शकतो. कमाईत वाढ होईल.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध शनीच्या नक्षत्रात जाणे खूप शुभ ठरणार आहे. मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नवीन प्रकारच्या व्यवसायात हात आजमावू शकता. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. कमाईचे नवे मार्ग खुलतील. नोकरीत सकारात्मक बदल होऊन आयुष्यात मोठे बदल घडतील. आयुष्यातील अडचणी कमी होतील.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा हा नक्षत्रातील गोचर खास फायदेशीर ठरू शकतो. विरोधकांवर तुमचं वर्चस्व राहील. नशिबाचीही साथ मिळेल. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. अनेक मार्गांनी यश मिळू शकतं. मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. समाजात तुमची प्रतिमा चांगली होईल. धनलाभाचे योग तयार होतील आणि मोठे निर्णय घेता येतील. बुद्धी अधिक तीक्ष्ण होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
