Mercury Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. मे महिन्यात बुध दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. ज्यात सर्वात आधी तो १५ मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि २९ मे रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. बुधाच्या एकाच महिन्यातील दोन वेळा होणाऱ्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल.

बुधाचे गोचर देणार धन-संपत्तीचे सुख

मेष (Mesh Rashi)

बुधाचे मे महिन्यात होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.

सिंह (Singh Rashi)

वृषभ राशीतील बुधाचे गोचर सिंह राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

बुध ग्रहाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या व्यावसायिक वाढीसाठी आणि प्रगतीसाठी अनुकूल आहे. सासरच्या मंडळींकडून किंवा जवळच्या मित्रांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तथापि, व्यवसायासाठी कोणासोबतही भागीदारी करणे टाळा. छुपे शत्रूंपासून सावध रहा. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुमचे विरोधकसुद्धा मदतीला येऊ शकतात.

कन्या (Kanya Rashi)

बुध ग्रहाचे संक्रमण कन्या राशीसाठी अत्यंत फायदेशीर असून ते वरदान ठरेल. तुम्ही हुशारीने आणि विवेकबुद्धीने काम केल्यास तुमच्या योजना यशस्वी होतील. सरकारी कामात आणि निविदा प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. प्रेम जीवन अधिक दृढ होईल आणि प्रेमविवाहाची शक्यता वाढेल. नवविवाहित जोडप्यांना संततीबाबतही आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क (Kark Rashi)

बुध ग्रहाचे संक्रमण कर्क राशीसाठी, विशेषतः करिअर आणि नवीन संधींच्या बाबतीत, सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. नोकरी बदलण्यासाठी किंवा काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. वडीलधारी मंडळी आणि भावंडे प्रचंड पाठिंबा देतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रेमजीवन सुधारेल आणि लग्नाच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या निर्णयांचे इतरांकडून कौतुक केले जाईल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हे बुध संक्रमण अत्यंत शुभ काळ आहे. लहान प्रयत्नांतूनही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या सहजपणे पार पडतील. प्रेमजीवन अधिक दृढ होईल आणि विवाह शक्य होईल. जोडप्यांना संतती होण्याची शक्यता आहे. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल.

मीन (Meen Rashi)

बुधाचे हे संक्रमण मीन राशीला ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण करेल. तुम्ही तुमच्या संभाषण शैली आणि व्यक्तिमत्त्वाने लोकांना आकर्षित कराल. तुमचे धैर्य तुम्हाला कठीण परिस्थितींवर मात करण्यास मदत करेल. तुमची अध्यात्म आणि समाजकार्यातील आवड वाढेल. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)