Budh Gochar 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धी, तर्क, वाणी, संवाद आणि व्यवसायाचा ग्रह मानला जातो. बुध आपल्या भ्रमणात एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे. पंचांगानुसार, ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी बुध त्याची स्वराशी मिथुन सोडून चंद्राच्या अधिपत्याखालील राशी कर्कमध्ये प्रवेश करेल.

बुधाचे हे संक्रमण २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालेल. जेव्हा बुद्धी आणि तर्काची राशी असलेला बुध, भावना आणि मनाची राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडतो. तसंच ज्योतिषांच्या मते, हे संक्रमण पाच राशींसाठी शुभ आणि फलदायी ठरेल.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी मदत करेल. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि विकासाच्या उत्कृष्ट संधी निर्माण होतील. स्वत:चा व्यवसाय चालवणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल आणि ते बाजारपेठेत एक नवीन ओळख निर्माण करतील.

मिथुन राशी

बुध तुमच्या राशीतून कर्क राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल. तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील आणि त्यात यश येईल. जर तुमचे काही पैसे अडकले असतील किंवा बऱ्याच काळापासून अडकले असतील तर ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे.

कन्या राशी

बुध हा कन्या राशीचा स्वामी ग्रह असल्याने हे गोचर तुमच्यासाठी आर्थिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर शुभ राहील. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि घरात सकारात्मकता तसंच शांततेचं वातावरण येईल.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी हा वेळ मिळेल. तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम निष्ठेने पूर्ण कराल आणि उत्कृष्ट परिणाम मिळवाल. तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल आणि तुमचे आरोग्य नेहमीपेक्षा खूपच चांगले राहील.

मकर राशी

हे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी अनेक सुखद बदल घडवून आणू शकते. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासंबंधी किंवा नातेसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. कामासाठी प्रवास होऊ शकते आणि तो भविष्यात फायदेशीर ठरेल.