Budh Gochar 2025 : बुध ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. त्यामुळे त्यांना ग्रहाचा राजकुमार मानले जाते. हा ग्रह बुद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य, पद प्रतिष्ठा आणि धन संपत्तीचा प्रतीक मानले जाते. जेव्हा बुध ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा दिसून येतो.
येत्या ७ मे ला बुध ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये ते २३ मे पर्यंत विराजमान राहीन. हे १६ दिवस तीन राशींसाठी अत्यंत फायदेशीर राहीन. त्यांच्या करिअरमध्ये वृद्धी दिसून येईल. समाजात त्यांचा मान सन्मान वाढेल. घरामध्ये लक्झरी वस्तू येतील. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत?
कुंभ राशी (Aquarius Zodiac)
बुध ग्रह मेष राशीमध्ये गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. यांच्या मेहनतीचे फळ यांना मिळेल. या लोकांना इंक्रीमेंटसह प्रमोशन मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी जे लोक बाहेर जाण्याचा विचार करत आहे, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहीन. या लोकांचे मन अध्यात्माकडे वळणार.
तुळ राशी (Libra Zodiac)
तुळ राशीच्या लोकांसाठी बुध गोचर ७ मे पासून लाभदायक ठरेन. हे लोक नोकरी सोडून व्यवसाय सुरू करू शकतात, ज्यामध्ये त्यांना सुरुवातीला यश मिळेल. गुंतवणुकीसाठी हा वेळ उत्तम आहे. हे लोक ज्या बचत योजनामध्ये पैसे लावतील, त्यामध्ये चांगला परतावा मिळू शकतो. या लोकांचे पैसे कमावण्याचे स्त्रोत वाढतील ज्यामुळे यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार.
कर्क राशी (Cancer Zodiac)
बुध राशी परिवर्तनाचा थेट प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर दिसून येईल. घरगुती अडचणी दूर होतील. जोडीदाराबरोबरच्या संबंधामध्ये गोडवा दिसून येईल. कुटुंबांमध्ये २-३ दिवसांसाठी फिरायला जाऊ शकता. या लोकांचे अडकलेले काम बुध गोचरमुळे यशस्वी होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना बुध गोचरमुळे यश मिळू शकते. बिझिनेस करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. घरी नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)