Budh Gochar In Swati Nakshtra : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला शिक्षण, व्यवसाय, एकाग्रता, बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यांचा कारक मानले जाते. त्यामुळे बुध ग्रहाच्या राशी आणि नक्षत्रातील बदलांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. सध्या बुध ग्रह तूळ राशीत आहे. आज, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी बुध ग्रहाने स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे. बुधाच्या राहू नक्षत्रातील प्रवेशामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो, तर इतरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

बुधाच्या स्वाती नक्षत्रातील प्रवेशामुळे विशेषतः वृषभ, तूळ आणि कुंभ राशींना फायदा होऊ शकतो. या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. बुध ग्रहाच्या स्वाती नक्षत्रातील प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया. पंचांगानुसार, बुधाने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी वक्री गतीने स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तो २५ नोव्हेंबरपर्यंत तेथेच राहील, त्यानंतर तो पुन्हा विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. स्वाती हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी १५ वे नक्षत्र आहे. याचा स्वामी राहू असून याची राशी तूळ आहे.

वृषभ

बुधाचा स्वाती नक्षत्रातील प्रवेश तुम्हाला अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण ठरू शकतो. बुध तुमच्या राशीच्या कुंडलीच्या सहाव्या घरात प्रवेश करणार आहे. परिणामी तुम्हाला कर्ज, नोकरी, स्पर्धा आणि आजारपण यांवर अधिक परिणाम जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो. तुम्ही कार्यक्षमता सिद्ध करण्यात यशस्वी होऊ शकतात. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. याव्यतिरिक्त, तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांना झुंज देऊ शकता. व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. जुन्या ग्राहकांशी तुमचे संबंध सुधारू शकतात. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही पैसे वाचवून अनावश्यक खर्च टाळू शकता.

तूळ

बुध ग्रहाचे स्वाती नक्षत्रातील गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. बुध तुमच्या कुंडलीच्या लग्न स्थानातून गोचर करत आहे. परिणामी तुमच्या संवाद कौशल्यात लक्षणीय बदल दिसून येऊ शकतो. तुम्ही तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकाल, ज्यामुळे समोरची व्यक्ती प्रभावित होऊ शकते. नोकरदार व्यक्तींवर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊ शकतात. हा काळ व्यावसायिकांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. नवीन संपर्क साधले जाऊ शकतात आणि व्यवसायाशी संबंधित प्रकल्पांमधून फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. जुनी अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात.

कुंभ

बुध ग्रहाचे स्वाती नक्षत्रातील गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता, ज्यामुळे महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. जर तुम्हाला चांगली नोकरीची संधी मिळाली, तर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यावसायिकांना त्यांच्या रणनीती प्रभावी वाटू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)