Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. बुध ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश केला असून बुध संवाद, बुद्धिमत्ता, व्यावसायिक चातुर्य, विश्लेषणात्मक कौशल्ये, निर्णयक्षमता आणि वित्त यांचे प्रतीक आहे, बुध २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत कन्या राशीत राहील. बुध ग्रहाचे हे गोचर १२ पैकी काही राशींसाठी फायदेशीर ठरेल.

बुधाचे गोचर भाग्य बदलणार

तूळ (Tula Rashi)

बुधाचे गोचर तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.

मिथुन (Mithun Rashi)

बुधाचे गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या जातकांसाठी बुधाचे गोचर आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना मात्र घाई न करता कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढेल आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीसाठी बुधाचे गोचर विशेष महत्त्वाचे मानले जाते, कारण बुध हा या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि कौशल्याचे कौतुक होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून योग्य नियोजन केल्यास बचतही वाढू शकते. नातेसंबंधांमध्ये स्पष्ट आणि संयमी संवाद ठेवला तर गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)