Budh Guru Dwidwadash Yog : बुध ग्रह ७ जुलै रोजी वक्री चाल चालत कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. बुधाच्या या बदलत्या स्थानामुळे गुरु ग्रहासोबत त्याचा ‘द्विद्वादश योग’ निर्माण होईल. यामध्ये गुरु ग्रहाची स्थिती बुधापासून दुसऱ्या भावात असेल, तर बुध ग्रह गुरूपासून बाराव्या (द्वादश) भावात असेल. या द्विद्वादश योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडून येऊ शकतात. विशेषतः कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, काही क्षेत्रांत या राशींना प्रतिकूल परिणामांचाही सामना करावा लागू शकतो.
१. मिथुन राशी (Gemini):
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रहाचे पुन्हा स्वराशीत (मिथुन) येणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते, तसेच मनपसंत ठिकाणी नोकरी मिळण्याचे योग आहेत. बुध तुमच्या वैवाहिक जीवनातही सुखद बदल घडवून आणेल, ज्यामुळे जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील. मात्र, खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि त्यांची एकाग्रता वाढेल.
२. कन्या राशी (Virgo):
कन्या राशीचा स्वामीदेखील बुधच आहे, त्यामुळे बुधाचे राशिपरिवर्तन आणि गुरू ग्रहाबरोबरचा द्विद्वादश योग तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरेल. करिअरच्या क्षेत्रात भूतकाळात केलेल्या कष्टांचे उत्तम फळ तुम्हाला मिळू शकते. मात्र, जर पूर्वी काही चुका झाल्या असतील, तर वरिष्ठांकडून बोलणी खावी लागू शकतात. बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, द्विद्वादश योगामुळे तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याचे योग आहेत.
३. तूळ राशी (Libra):
तूळ राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश योग अत्यंत भाग्यवान ठरू शकतो. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. ज्या लोकांना परदेशात जाऊन नोकरी करायची होती, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. काही जण स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यात यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवता येईल. मात्र, आरोग्याच्या बाबतीत तुला राशीच्या लोकांनी थोडी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
