Budh Guru Pratiyuti Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचागुरु गुरु आणि ग्रहांचा राजकुमार बुध हे ग्रहमालेतील महत्त्वाचे ग्रह मानले जातात. दोन्ही ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. धन आणि समृद्धीचा कारक ग्रह गुरु एक वर्षात राशी बदल करतो आणि बुध एक महिन्यानंतर दुसऱ्या राशीत जातो, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी गुरु वृषभ राशीत तर बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात दोन्ही ग्रह एकमेकांच्या १८० अंशांवर असतील. अशा स्थितीत प्रतियुती नावाचा योग तयार होत आहे, ज्याचा अनेक राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो, त्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी गुरु आणि बुध यांनी तयार केलेला प्रतियुती योग भाग्यशाली ठरू शकतो…

द्रिक पंचांगनुसार ४ डिसेंबर रोजी गुरु आणि बुध १८० अंश स्थितीत एकमेकांसमोर असतील. अशा स्थितीत शक्तिशाली प्रतियुती योग तयार होत आहे. बुध आणि गुरु हे दोन्ही शुभ ग्रह मानले जातात, अशा स्थितीत दोन्ही ग्रह परस्परांसमोर आल्यानंतर तयार होणारा प्रतियुती योग हा काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा

प्रतियुती योगाने ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस? नोकरी व्यवसायात मिळेल यश (Budh Guru Pratiyuti Yog 2024)

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरुचा संयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. याद्वारे तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. अनावश्यक खर्चापासून तुमची सुटका होऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. बौद्धिक क्षमता वाढेल. या काळात तुम्ही तुमच्या सर्व कामात यशस्वी होऊ शकता. नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांनाही लाभ मिळू शकतो. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांनाही या काळात खूप फायदा होणार आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरुचा संयोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता, एकाग्रता आणि तर्कशक्ती वाढेल, ज्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. याने तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही करत असलेल्या कामाचे कौतुक होईल. तुमची पात्रता आणि कौशल्ये लक्षात घेता, पदोन्नतीसह पगार वाढू शकतो. व्यवसायातही भरपूर कमाई करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. यासह तुम्ही पैसे गोळा करण्यातही यशस्वी होऊ शकता. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार? जाणून घ्या तारखा, पूजा विधी अन् मुहूर्त

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही प्रतियुती योग खूप शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. गुरुदेवांच्या कृपेने प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक प्रचंड यश मिळवू शकतात. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढू शकतो. याशिवाय वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

(टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader