budh guru yuti make panditya yog : बुध ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे, जिथे त्याची युती गुरु बरोबर होणार आहे. या खास युतीमुळे हा दुर्मिळ योग तयार होणार आहे. बुध बुद्धीचे तर गुरू ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा ‘पांडित्य योग’ तयार होतो. हा योग व्यक्तीला बुद्धिमान व ज्ञानी बनवतो, समाजात एक वेगळी ओळख देतो, व्यवसायाच्या वाढीस प्रोत्साहन देतो. तर आज कोणत्या राशींसाठी हा योग शुभ जाईल जाणून घेऊयात.
कोणत्या ४ राशींना होणार लाभ?
१. कर्क
हा योग तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. अचानक पैसे परत मिळतील, आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीतून नफा होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना पदोन्नतीची अपेक्षा करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही धार्मिक तीर्थयात्रेलाही जाऊ शकता.
२. मिथुन
गुरू व बुध यांची ही उत्तम युती तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येत आहे. व्यवसायात प्रचंड प्रगती होताना दिसेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही मोठे व्यवहार निश्चित होऊ शकतात, समाजात तुमचा आदर वाढेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात भरघोस नफा होण्याचीही शक्यताही दिसते आहे.
३. कन्या
पांडित्य योग तुमच्या करिअर व आर्थिक परिस्थितीला मोठी चालना देऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हाल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकू येऊ शकते. व्यावसायिक चांगली कमाई करतील.
४. धनु
लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात गुंतलेल्या लोकांसाठी हा योग शुभ ठरेल. या काळात तुमची निर्णयक्षमता सुधारेल. प्रत्येक प्रयत्नात नशीब पूर्णपणे साथ देईल, कठोर परिश्रमाचे फळ मिळेल, परदेश प्रवासाची शक्यता आहे. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामातून भरीव नफा मिळेल.
