Budh In Kanya Rashi 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तनासह एका निश्चित कालावधीनंतर वक्री किंवा मार्गी अवस्थेतही जातात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. पंचांगानुसार, बुधाचे कन्या राशीत जी त्याची ‘उच्च’ राशी आहे. होणारे संक्रमण ही एक अत्यंत महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे. ७ सप्टेंबर २०२६ ते २ डिसेंबर २०२६ हा कालावधी विशेष प्रभावी ठरेल, कारण या काळात शक्तिशाली ‘भद्र राजयोग’ तयार होत आहे. २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात बुध वक्री अवस्थेत असला, तरीही स्वतःच्या राशीतील त्याचे स्थान काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल आणि समृद्धीदायक फळे देणारे ठरेल.
बुधाचे गोचर भाग्य बदलणार
मिथुन (Mithun Rashi)
बुधाची वक्री चाल मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील.
कन्या (kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाची वक्री चाल अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
सिंह (Singh Rashi)
बुधाची वक्री चाल सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
धनु (Dhanu Rashi)
बुधाचे कन्या राशीतील गोचर धनु राशीच्या जातकांसाठी कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता असून रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. आरोग्याबाबत मात्र निष्काळजीपणा टाळावा.
वृश्चिक (Vruschik Rashi)
बुधाचे कन्या राशीतील गोचर वृश्चिक राशीसाठी शुभ परिणाम देणारे ठरू शकते. शिक्षण, करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नवीन कौशल्य शिकण्याची किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल जाणवण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
