Budh Krutika Nakshatra Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वाणी, बुद्धी आणि व्यवसायाचा कारक ग्रह बुध, १३ मे २०२६ रोजी कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. बुध १८ मे २०२६ पर्यंत गुरूच्या अधिपत्याखालील या नक्षत्रात राहील. यानंतर बुध १९ मे २०२६ रोजी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, बुधाचे हे गोचर पाच दिवस असेल, पण कोणत्या चार राशींसाठी कृत्तिका नक्षत्रातील बुधाचे गोचर फलदायी ठरेल जाणून घेऊ…

मेष

बुधाचा नक्षत्र गोचर मेष राशीच्या व्यक्तींचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवेल. तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य अचूक असेल, ज्यामुळे तुमची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकेल. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. तुमची जुनी कर्जे फेडली जाऊ शकतात. संवाद कौशल्य अधिक स्पष्ट होईल, ज्यामुळे तुम्हाला बोलण्यातून इतरांवर प्रभाव टाकण्यास मदत होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे नक्षत्र गोचर सुखसोयी आणि ऐश्वर्यात वाढ करेल. कुटुंबाबरोबरचे संबंध अधिक सुसंवादी होतील. प्रलंबित घरगुती कामे पूर्ण होतील. आयात-निर्यात किंवा विदेशी व्यापारात गुंतलेल्यांना लक्षणीय नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला अधिक एकाग्र आणि शांत वाटेल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढू शकते.

मिथुन

मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे, त्यामुळे बुधाचे नक्षत्र गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध निर्माण होतील.