Kendra Drishti Rajyog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या स्थानात येऊन ९० अंशाचा कोन बनवतात, तेव्हा त्याला ‘केंद्र दृष्टी’, असे म्हटले जाते. मंगळ हा ऊर्जा, धैर्य, पराक्रम आणि जलद निर्णयांचा कारक आहे; तर बुध हा बुद्धी, तर्कशास्त्र, संवाद आणि व्यापाराचा कारक मानला जातो. जेव्हा ऊर्जा आणि बुद्धिमत्ता एकमेकांसमोर येतात, तेव्हा व्यक्तीमध्ये कठीण प्रसंगांवर मात करून, मोठा फायदा मिळविण्याची अद्भुत क्षमता निर्माण होते. २ ऑक्टोबरला बनणाऱ्या या बुध-मंगळ केंद्र दृष्टीमुळे कोणत्या ४ राशींचे भाग्य उजळणार आहे, ते जाणून घेऊ…
मिथुन (Gemini)
बुध हा मिथुन राशीचा स्वामी आहे. मंगळाच्या या केंद्र दृष्टीमुळे तुमच्या कार्यशैलीत लक्षणीय सुधारणा होईल. जे लोक व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान (IT), मार्केटिंग किंवा मीडिया क्षेत्राशी जोडलेले आहेत, ते आपल्या रणनीतीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करतील. तुमचे तर्कशुद्ध विचार आणि निर्णयक्षमता यांमुळे एखाद्या मोठ्या व्यावसायिक व्यवहाराला अंतिम स्वरूप मिळू शकते. अचानक अडकलेला पैसा परत मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कन्या (Virgo)
बुध देवाचे कन्या राशीवरही अधिपत्य आहे. त्यामुळे केंद्र दृष्टी योगाने नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट किंवा नेतृत्वाची मोठी जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या गती आणि अचूकतेवर खूश होतील, ज्यामुळे पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याचा मार्ग मोकळा होईल. रिअल इस्टेट किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवसायात मोठा नफा मिळण्याची संधी आहे.
वृश्चिक (Scorpio)
मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी आहे. बुधाबरोबरची ही केंद्र दृष्टी तुमच्या धैर्य आणि नियोजनाला योग्य दिशा देईल. तुम्ही जे काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करीत होता, त्यात तुम्हाला त्वरित यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित आर्थिक फायदा होण्याचे मजबूत संकेत आहेत. आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण आव्हानेही सहज पार करू शकाल.
मकर (Capricorn)
ही स्थिती मकर राशीच्या लोकांसाठी भाग्य आणि कर्म यांच्यात योग्य समतोल साधण्याचे काम करील. नवीन वाहन, घर किंवा जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशी व्यापार किंवा दूरच्या ठिकाणांशी संबंधित कामात अपेक्षित यश आणि नफा मिळेल. कुटुंबात चाललेला जुना वैचारिक मतभेद संपेल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
