Graha Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते, ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडतो. मे महिना सुरू होईन एक आठवडा झाला असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ७ ग्रहांचे गोचर होणार आहे, ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यावर होईल.

पंचांगानुसार, ०७ मे ते १४ मे २०२६ पर्यंत ७ ग्रह राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतील. ०७ मे रोजी पहाटे ०४ वाजून ०१ मिनिटांनी बुध भरणी नक्षत्रात गोचर करेल. तर ८ मे रोजी ०९ वाजून ५१ मिनिटांनी शुक्र मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल. तसेच ११ मे रोजी मध्यरात्री १२ वाजून ४७ मिनिटांनी मंगळ स्वराशी असलेल्या मेष राशीत गोचर करेल. त्यानंतर त्याच दिवशी तो सकाळी ०७ वाजून ३७ मिनिटांनी सूर्य कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. १२ मे रोजी पहाटे ०५ वाजून २३ मिनिटांनी अरुण ग्रह देखील कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर १३ मे रोजी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी बुध देखील कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करतो. १४ मे रोजी सकाळी ०७ वाजून १९ मिनिटांनी गुरू ग्रह पुनर्वसु नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर बुध ग्रह १३ मे रोजी रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी क्रांतिवृत्त परिवर्तन करून उत्तरमुखी होईल. सलग ७ दिवस ७ ग्रहांचे गोचर काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

७ ग्रहांचा गोचर ‘या’ राशींचे नशीब बदलणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचरामुळे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)