Budh Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा प्रभाव १२ राशींपैकी विविध राशींवर पाहायला मिळतो. नवग्रहांमध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. बुध ग्रहाला वाणी, व्यापार, संचार, तर्क आणि विद्येचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जेव्हा तो स्वराशी किंवा स्वतःचे स्वामीत्व असलेल्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव अधिक वाढतो.
पंचांगानुसार, बुध २२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०१ वाजून ४१ मिनिटांनी स्वतःचे स्वामीत्व असलेल्या रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधाचे हे गोचर नक्कीच काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल.
बुधाचे नक्षत्र परिवर्तन यश-कीर्ती वाढवणार
मिथुन (Mithun Rashi)
या राशीच्या व्यक्तींना बुधाचे नक्षत्र गोचर मालामाल करेल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या लोकांसाठी देखील बुधाचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरणार आहे. या काळात समाजात यश-कीर्ती, वाढेल. आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल, कर्ज फिटण्यास मदत होईल.
मीन (Meen Rashi)
बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा हे गोचर फायदेशीर ठरेल. आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

