Budh Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला बुद्धी, विद्या आणि वाणीचा कारक ग्रह मानले जाते. बुध वेळोवेळी राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन करतो तसेच वक्री, मार्गी देखील होतो. पंचांगानुसार, बुध ग्रह १० मार्च २०२६ रोजी पहाटे ०७ वाजून ४७ मिनिटांनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रातून शततारका नक्षत्रात प्रवेश करेल. शततारका नक्षत्राचा स्वामी राहू असून बुधाचे या नक्षत्रातील गोचर काही राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरू शकते.
बुधाचे नक्षत्र परिवर्तन भरभरून यश देणार
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा हे गोचर फायदेशीर ठरेल. आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या लोकांसाठी देखील बुधाचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरणार आहे. या काळात समाजात यश-कीर्ती, वाढेल. आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल, कर्ज फिटण्यास मदत होईल.
मिथुन (Mithun Rashi)
या राशीच्या व्यक्तींना बुधाचे नक्षत्र गोचर मालामाल करेल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र गोचर नक्कीच लाभदायक सिद्ध होईल. या काळात तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. अचानक हातात भरपूर पैसा येईल. करिअरमध्ये उत्तम यश मिळवाल. या काळात गुंतवणूक करणं तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनात गोडी वाढेल, जोडीदाराबरोबर दुरचा प्रवास कराल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

