Surya Gochar 2026 : ऑक्टोबरच्या मध्यात सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करील आणि १६ नोव्हेंबरपर्यंत तो याच राशीत राहील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे तूळ राशीतील हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण- या काळात तूळ राशीत आधीपासूनच बुध आणि शुक्र ग्रह उपस्थित असतील. त्यामुळे बुधादित्य आणि शुक्रादित्य योगासह ‘त्रिग्रही योग’ निर्माण होत आहे.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मविश्वास, नेतृत्व, पद-प्रतिष्ठा आणि पित्याचा कारक मानले जाते. त्यामुळे सूर्याच्या या राशिबदलाचा थेट परिणाम नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक मान-सन्मानावर दिसून येतो. या गोचरामुळे सिंह, तूळ, मकर व कुंभ या चार राशींच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंह

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे हे गोचर तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि प्रलंबित कामांना वेग येण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला त्यांच्या चांगल्या कामगिरीचा फायदा होईल. व्यापाऱ्यांसाठी व्यवसाय विस्ताराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

तूळ

सूर्याचे हे गोचर तूळ राशीतच होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. कार्यक्षेत्रात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत, तसेच समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

मकर

सूर्याचे तूळ राशीतील हे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरेल. कार्यक्षेत्रात तुमची नेतृत्वक्षमता दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. बऱ्याच काळापासून अडकलेले काम आता पुढे सरकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. घरातील कौटुंबिक अडचणी कमी होतील.

कुंभ

हे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसाय दोन्ही दृष्टींनी फायदेशीर मानले जात आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कमाईचे नवीन मार्ग खुले होतील. व्यापारात तुमची पकड मजबूत होईल. काही लोकांसाठी जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)