Budh Swati Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिषात बुध ग्रहाकडे बुद्धी, संवाद, तर्कशास्त्र, व्यापार व वाणीचा कारक ग्रह म्हणून पाहिले जाते. त्यामुळे बुधाच्या चालीतील बदलाचा थेट परिणाम नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक बाबींवर दिसून येतो. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बुधाचा नक्षत्रबदल काही राशींच्या व्यक्तींसाठी फलदायी ठरू शकतो.
स्वाती नक्षत्र तूळ राशीत येते आणि राहू हा या नक्षत्राचा स्वामी मानला जातो. बुध आणि राहूचा हा संयोग बुद्धी, संवाद, व्यापार आणि नवीन संधींशी जोडला जातो. या काळात काही राशींच्या लोकांना नोकरीत बदल, व्यवसायात फायदा, अडकलेली कामे पूर्ण होणे आणि आर्थिक स्थिती मजबूत होणे, असे सकारात्मक परिणाम मिळू शकतील. मात्र, राहूच्या प्रभावामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेण्याचा सल्ला दिला जातो.
वृषभ
बुधाचा स्वाती नक्षत्रातील बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नोकरी करणाऱ्यांचे कार्यक्षेत्रात कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन डील्स किंवा चांगल्या संधींमधून मोठा फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील.
मिथुन
बुध ग्रह स्वतः मिथुन राशीचा स्वामी आहे आणि त्यामुळे हे नक्षत्र परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी खूप खास आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे वेगाने मार्गी लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. परदेशात जाण्याचे किंवा उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रलंबित प्रवास पूर्ण होण्याची शक्यता असून, आर्थिक आघाडीवर मोठा दिलासा मिळेल.
कन्या
हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे. व्यवसायात नवीन डील किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्यांसह तुमच्या कामाला नवी ओळख मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि अनावश्यक खर्च कमी झाल्याने बचत वाढेल. जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य लाभेल.
तूळ
हा बदल तूळ राशीच्या लोकांसाठीअत्यंत विशेष मानला जात आहे. या काळात शत्रूंवर विजय मिळविता येईल आणि जुने तणाव दूर होतील. अचानक धनलाभाचे योग बनत असल्याने आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. तुमची संवादशैली अधिक प्रभावी बनेल.
मकर
बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रांत मोठे बदल घडवून आणेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुधारेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
