Budh Gochar November 2026 : ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्कशक्ती, संवाद, शिक्षण, व्यापार आणि करिअरचा कारक मानला जातो. कुंडलीत बुधची स्थिती उत्तम असल्यास व्यक्तीला तीव्र बुद्धी, निर्णय घेण्याची उत्तम क्षमता आणि व्यवसायात घवघवीत यश मिळते. तसेच, बुधाच्या चाल आणि नक्षत्रातील बदलांचा प्रभाव सर्व १२ राशींच्या आयुष्यावर स्पष्टपणे दिसून येतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली रास आणि नक्षत्र बदलत असतात. साधारणपणे बुध ग्रह दर १३ ते १४ दिवसांनी आपले नक्षत्र बदलतो. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी बुध ग्रह राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या काळात बुध तूळ राशीतच विराजमान असेल आणि २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत याच नक्षत्रात राहील.

बुध नक्षत्र बदलाचा कोणत्या राशींना होणार फायदा?

बुधाच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल, परंतु ५ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल:

१. मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन अतिशय अनुकूल ठरू शकते. या काळात तुमची सर्जनशीलता आणि तार्किक क्षमता मजबूत होईल. मीडिया, लेखन, शिक्षण आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांना एखादी मोठी संधी मिळू शकते.

२. कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे गोचर आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देऊ शकते. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. वडिलोपार्जित व्यवसायाशी जोडलेल्या लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

३. वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे नक्षत्र परिवर्तन आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकते. या काळात मार्केटिंग, सेल्स आणि कम्युनिकेशनशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू तुमचे एखादे पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात.

४. धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचा स्वाती नक्षत्रातील प्रवेश नफा आणि फायद्याच्या नवीन संधी घेऊन येऊ शकतो. या काळात व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उत्तम संधी मिलतील. नोकरी करणाऱ्या लोकांना एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

५. मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे नक्षत्र परिवर्तन कष्टाचे पूर्ण फळ मिळवून देणारे ठरू शकते. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नेटवर्किंग आणि संवादाच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)