Viprit Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या राशीबदलामुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ योग तयार करतात. दरम्यान हे शुभ आणि अशुभ योग सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम करतात. अशातच आता बुध ग्रहामुळे अजून एक राजयोग तयार होतोय. बुध ग्रहाने २० फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे विपरित राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींना खूप फायदा होण्याची शक्यता आहे.

‘या’ राशींना होणार धनलाभ?

कर्क राशी

बुध ग्रहाच्या गोचरमुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. हा राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यापार्‍यांनाही या काळात नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले किंवा रोखलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकतं. नोकरदारांना बढती आणि वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो. शेअर्समध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा

(हे ही वाचा : ३०० वर्षांनी महाशिवरात्रीला ‘शुभ योग’ जुळून आल्याने ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ? महादेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत )

कन्या राशी

विपरीत राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकतं. करिअरमध्ये तुमची प्रगती होऊ शकते. व्यवसायात तुम्हाला काही प्रकल्प मिळू शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कोर्टकचेरीच्या प्रकरणांतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. समाजात मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची अनेक शक्यता आहेत. 

धनु राशी

विपरीत राजयोगाची निर्मिती धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. व्यापार्‍यांनाही या काळात नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ, पद आणि प्रतिष्ठेतही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात नवीन मालमत्ता खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणातील नातं आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो. 

(टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)