Horoscope Today 29 April 2026 In Marathi : आज २९ एप्रिल २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरु होईल. आज हर्षण आणि वज्र योग जुळून येईल आणि रात्री १२ वाजून १६ मिनिटांपर्यंत हस्त नक्षत्र आणि दुपारनंतर चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ११ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजून १ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज प्रदोष व्रत असणार आहेत. तुमच्या राशीवर शिवकृपा कशी राहणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २९ एप्रिल २०२६ (Today Horoscope 29 April 2026 In Marthi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. मित्रांशी मतभेद संभवतात. काही गोष्टी अचानक घडतील. मानसिक ताणतणाव जाणवेल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस शांततेत जाईल. घरात तुमचा दबदबा राहील. संपर्कातील लोकांची मदत मिळेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
उगाच चीड चीड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आत्मविश्वास सोडू नका. उष्णतेचा त्रास जाणवेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
जुनी इच्छा पूर्ण होईल. कमिशनमधून फायदा होईल. कामात कल्पकता दाखवाल. व्यवहारात चोख राहाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तीचे धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. हातून चांगले लिखाण होईल. बौद्धिक छंद जोपासाल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
बुद्धीला ताण द्यावा लागेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा त्रास जाणवेल. भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात. घरगुती वस्तु खरेदी कराल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल. हातातील अधिकार वापराल. मानापमानाला सामोरे जाल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. फार काळजी करत बसू नका. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्या कडील अधिकाराची जाणीव ठेवावी. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
उगाच चीड चीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल. इतरांचे कौतुक कराल. कलेची आवड जोपासाल. मनाजोगी खरेदी केले जाईल.
