Budh Purnima 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. पंचांगानुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ५५ मिनिटांनी बुधाचे मेष राशीत गोचर करणार असून बुध मेष राशीत नीच होतो. या राशीत बुध १५ मे पर्यंत राहील. दरम्यान, तोपर्यंतचा काळ १२ पैकी काही राशींसाठी नुकसानदायी ठरू शकतो. बुधाचे हे गोचर बुद्ध पौर्णिमेआधी होईल.
बुधाचे गोचर ‘या’ राशींसाठी घातक
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीसाठी बुधाचे हे गोचर धक्कादायक ठरेल. या काळात कोणत्याच कामात घाई करू नका, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज वाढू शकतात आणि संवादही तुटू शकतो. जे अविवाहित आहेत त्यांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागेल. मनातील गुप्त गोष्टी कोणासमोरही बोलू नका.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे गोचर १२ व्या भावात होईल. ज्यामुळे तुमचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील, आरोग्य समस्या जाणवतील. वैवाहिक जीवनात मतभेद जाणवतील. आर्थिक समस्या उद्भवतील. कामाच्या ठिकाणी प्रचंड मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो.
मकर (Makar Rashi)
मकर राशीसाठी हा काळ खूप सावधगिरी बाळगण्याचा आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा; आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतेही निर्णय चुकीचे ठरू शकतात. तुमच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे महत्त्वाची कामे धोक्यात येऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या आरोग्याकडे आणि बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. रागामुळे जवळचे नातेसंबंध बिघडू शकतात. एखाद्या नातेवाईकाशी मोठे मतभेद होण्याची शक्यता आहे. मेच्या अखेरीस तुमची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते.आरोग्याच्या बाबतीत, डोळ्यांशी संबंधित कोणताही गंभीर आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. मित्र-मैत्रिणींबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
