Budh Pushya Nakshtra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. हे भगवान शनिदेवांचे नक्षत्र असून, त्याचा अधिपती ग्रह गुरु आहे. जेव्हा बुद्धीचा ग्रह बुध, स्थिर पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा तो निर्णयक्षमता मजबूत करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. बुध ८ ऑगस्ट रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रमण तीन राशींच्या लोकांच्या बौद्धिक क्षमता वाढवेल. या नक्षत्रात बुधाच्या आगमनामुळे बौद्धिक कार्य, शेअर बाजार, बँकिंग, विपणन, माध्यम व व्यवसाय या क्षेत्रांतील लोकांना प्रचंड लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया की, हे संक्रमण कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे.
मिथुन
बुधाच्या संक्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, तुमचे बोलणे अधिक मधुर होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या संवाद कौशल्याचे कौतुक होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.
कन्या
बुधाच्या गोचरामुळे तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचीही शक्यता आहे. तुमच्या राशीतील बुधाच्या गोचरामुळे तुमच्या कामात शिस्त आणि अचूकता येईल. नवीन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. मोठे व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल.
तूळ
तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. बुधाचे हे गोचर तुमच्या करिअरला गती देईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या योजनांचे कौतुक होईल. या काळात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मकर
या काळात तुम्ही अचूक निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल आणि भागीदारीतून फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही करिअरसंबंधी योग्य निर्णय घेऊ शकाल.
