Budh Rashi Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. पंचांगानुसार, बुध ग्रह ०५ ऑगस्ट २०२६ कर्क राशीत गोचर करणार आहे जो २२ ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. बुध ग्रहाच्या चंद्राच्या राशीतील गोचराने १२ पैकी काही राशींच्या लोकांचे नशीब बदलेल.

बुध ग्रहाचे गोचर भाग्य चमकवणार

मिथुन (Mithun Rashi)

या राशीच्या व्यक्तींना बुधाचे नक्षत्र गोचर मालामाल करेल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा हे गोचर फायदेशीर ठरेल. आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या लोकांसाठी देखील बुधाचे ग्रह गोचर अनुकूल ठरणार आहे. या काळात समाजात यश-कीर्ती, वाढेल. आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल, कर्ज फिटण्यास मदत होईल.

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळात खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)