Budh Rashi Parivartan November 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी आता ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने आज सोमवारी २७ नोव्हेंबरला धनु राशीत गोचर केलं आहे. बुधदेव धनु राशीत २८ डिसेंबरपर्यंत विराजमान असणार आहेत. बुधाच्या या संक्रमणामुळे ‘महाधन योग’ निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना मिळणार अपार धन?
वृषभ राशी
बुधदेवाच्या राशी परिवर्तनामुळे वृषभ राशींच्या लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. कामातील अडथळे दूर होऊन तुमच्या कामाला गती लाभू शकते. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. कोर्टाच्या कामातही तुम्हाला यश मिळू शकते. एकंदरीत, हा काळ सर्वच दृष्टीने चांगला जाऊ शकतो.
(हे ही वाचा : वर्षाच्या अखेरिस ३ दुर्लभ योग घडल्याने ‘या’ राशींना नोकरीसह मिळणार प्रचंड पैसा? शनि-बुध कृपेने होऊ शकते धनवृष्टी )
सिंह राशी
बुधाचे राशी परिवर्तन सिंह राशींच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरु शकते. नोकरीत प्रगती होऊन नवीन चांगली संधी मिळू शकते. व्यापारात नवीन योजनेमध्ये लाभ मिळू शकतो. रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. नशिबाची साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक भरपूर पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना वरदानापेक्षा कमी नाही. या राशींच्या लोकांचे नशीब चांदीसारखे चमकण्याची शक्यता आहे. हा महिना सुखाचा, समृद्धीचा आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा ठरु शकतो. बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गालाही या काळात यश मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)