budh shani posititon make shadashtak yog : ९ ऑक्टोबर २०२६ रोजी, बुध व शनी एकमेकांपासून १५० अंशांवर स्थित असतील, ज्यामुळे षडाष्टक योग तयार होईल. हा योग अत्यंत वेदनादायी मानला जातो. कारण – हे दोन्ही ग्रह सहाव्या आणि आठव्या घरात स्थित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, सहावे घर आजार, कर्ज, शत्रू आणि तणाव दर्शवते, तर आठवे घर अडथळे, आणि अचानक येणारी संकटे दर्शवते. जेव्हा बुध व शनी हा योग तयार करतात, तेव्हा मानसिक ताण वाढतो आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. हा योग ९ ऑक्टोबर रोजी बुध आणि शनीमध्ये तयार होणार आहे. या योगामुळे कोणत्या राशींना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागेल हे जाणून घ्या.

मेष

षडाष्टक योगाचा तुमच्या राशीवर खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आर्थिक आघाडीवर मोठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. अचानक खर्च वाढू शकतो. अविचारी गुंतवणूक करणे टाळा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गोष्टी बिघडू शकतात.

मिथुन

तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक परिस्थितीही खालावण्याची शक्यता आहे. सर्व काही काळजीपूर्वक करा. मतभेद टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कामातील थोडासा निष्काळजीपणाही महागात पडू शकतो. या काळात त्वचा आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

कन्या

या काळात तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. कारण -यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. मानसिक ताण वाढू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगावी. अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते, म्हणून सावध रहा.

वृश्चिक

षडाष्टक योग तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. तुमच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. हुशारीने गुंतवणूक करा. गाडी चालवताना काळजी घ्या, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे टाळा, अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)